श्री गणपती आरती :सुखकर्ता दुःखहर्ता । Shri Ganpati Aarti : Shukhkarta Dhukhharta
सुरवकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगीं सुंदर उटि शेंदुराची ।।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।१।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।।
चंदनाचीं उटी कुंकमकेशरा ।।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।।
रूणझुणती नूपुरें चरणी घागरिया ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति।।
दर्शनमात्रे मनकामना पुरती।।२।
लंबोदर पितांबर फणिवरबंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटीं पावावें निर्वाणी रक्षावें सुरवरवंदना।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।३।।
No comments